
लोकहित लाईव्ह न्युज मंगरूळ (कारखाना ) प्रतिनिधी हर्षनंदा वाकोडे
दिनांक .९ मे २०२५ येथून एक किलोमीटर अंतरावर मंगरूळ वडगाव रोडवर गिट्टीचा ढिगारा सहा महिन्यापासून रस्त्याच्या मधोमध सुरेश बेडेकर यांच्या शेताजवळ पडून असल्याने छोटे मोठे अपघात होताना दिसून येत आहे. सामाजिक बांधकाम विभाग यवतमाळ यांचे दुर्लक्ष होत असून सदर गीट्टीचा ढिगारा उचलण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. डिसेंबर महिन्यामध्ये येथील नाल्यावर पुलाची बांधकाम स्टआटम कॅन्सलटसी नागपूर नाबार्ड कडून काम केले होते. पूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर चार ब्रास गिट्टी पुलाच्या मधोमध पडून असल्याने दुचाकी वाहन चालक अनेक वेळा याठिकाणी पडले आहे . सदर ठेकेदारांनी तेव्हापासून पाव अर्धा इंच साईज ची रोडवर पडून असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.