
उमरखेड तालुक्यातील बाळदी ग्रामपंचायत मध्ये प्रभारावर असलेले डी .बी .सूर्यवंशी हे गेल्या 4 ते 5 वर्षापासून बाळदी गावामध्ये असलेले ग्रामसेवक यांच्याकडे बाळदी गावाचा प्रभार असून बाळदी सह त्यांच्याकडे अजून दोन गावाचा कार्यभार असल्यामुळे सदर ग्रामसेवक गावामध्ये सातत्यपूर्ण कधीच येत नाहीत.
त्यांच्याकडे इतर दोन गावाचा पदभार असल्यामुळे गावामध्ये नियमित न येणे, गावातील नागरिकांच्या कामकाजाला प्राधान्य न देणे, तसेच कधी नागरिकांनी समस्या घेऊन कार्यालयात आले असता.
ग्रामसेवक कधीच उपलब्ध नसतात त्यामुळे बाळदी गावाचा प्रभार असलेले ग्रामसेवक श्री, डीबी सूर्यवंशी यांचा पदभार काढून बाळदी गावासाठी कायमस्वरूपी इतर ग्रामसेवकाची नेमणूक करून देण्यात यावी.
श्री. डी.बी सूर्यवंशी हे गेल्या 4 ते 5 वर्षापासून इथेच असल्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत प्रशासनातील पदाधिकाऱ्यांसोबत हितसंबंध व मैत्रीपूर्ण संबंध झाल्यामुळे नागरिकांच्या विकासात्मक व वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये हेतू परस्पर अडथळा निर्माण करून नागरिकांचे आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून नियमित होत असल्यामुळे सदर
ग्रामसेवकाच्या कार्य प्रणालीला कंटाळून आपणाकडे ग्रामसेवक बदलवून मिळण्याची विनंती करत आहोत.
आमच्या गावाचा सदर ग्रामसेवक श्री, डी बी. सूर्यवंशी यांचा प्रभार काढून इतर चांगल्या कर्तव्य दक्ष ग्रामसेवकाची नियुक्ती बाळदी गावासाठी करून द्यावी. अशी गावकऱ्यांची मागणी आहे,
यावेळी प्रवीण इंगळे , ( सामाजिक कार्यकर्ते ) प्रफुल वानखेडे, भगवान भोंग, दीपक ठाकरे, संतोष हरण, अशोक वटाणे, राजकुमार भगत, शामराव वानोळे, गणपत कोंडबा दुधे आदी उपस्थित होते.