विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
नितीन भूतडा भारतीय जनता पार्टी पुसद, यवतमाळ जिल्हा समन्व्यक व महेंद्र मानकर यांनी शुक्रवार 6 सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय महागाव रोड उमरखेड येथे पत्रकार परिषद घेत कालवश नागसेन मानकर मागासवर्गीय सहकारी सुतगिरणी उमरखेड येथे उभारण्याचे सांगितले. यवतमाळ जिल्हातील उमरखेड तालुका है प्रमुख कापूस उत्पादक तालुका आहे पैनगंगा नदीच्या खोऱ्याने सुपीक झालेल्या जमिनीत मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते तसेच उमरखेड तालुका व आजूबाजूच्या परिसरात मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि उमरखेड तालुक्यातील मागासवर्गीय शेतकरी हा आजही पारंपरिक पद्धतीने शेती करतो आहे
त्यामुळे तालुक्यातील मागासवर्गीय शेतकऱ्यांचे सामाजिक व आर्थिक उत्थान करण्याच्या दृष्टीने व त्यांना सहकाराच्या मार्गाने उद्यमशील बनवण्याच्या दृष्टीने, मा. आयुक्त वस्त्रद्योग आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नागपुर यांनी पत्र क्रमांक ७१३१ विनांक २९ ऑगस्ट २०२४ नुसार बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा उमरखेड येथे सूतगिरणीच्या नावे खाते उगडण्याची परवानगी दिली असून बँक ऑफ महाराष्ट्र येथे मुख्य प्रवर्तक च्या नावे सूतगिरणीचे खाते उघडण्यात आले आहे.
सदर सुतगिरणी स्थापन करताना मागासवर्गीय समाजातील युवा नेतृत्वाला उद्यमशील बनवण्याच्या दृष्टीने. सिद्धार्थ बरडे याची सर्वानुमते कालवश नागसेन मानकर सहकारी सुतगिरणी उमरखेडच्या मुख्य प्रवर्तक पदी सर्व सभासदांनी एकमतांनी निवड केली. सदर सुतगिरणीचे कार्यक्षेत्र उमरखेड, महागाव, दिग्रस, आर्णी व यवतमाळ हे तालुके असणार आहे, सुतगिरणी पंचवार्षिक योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर करून कमान व मंजूरी घेऊन ३ महिन्याच्या आत सुतगिरणीच्या बांधकामास सुरुवात होणार असल्याचे म्हटले आहे.
रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्या. दिग्रस येथे दोन महिन्या आधी उमरखेड-महागाव तालुक्यातील बरेच शेतकरी सुतगिरणी पाहण्याकरीता आले होते त्यानंतर भाजपाचे नेते नितीनभाऊ भूतडा यांनी सुद्धा सुतग्रिगुणीला भेट दिली. त्यावेळी अशीच सुतगिरणी उमरखेड विधानसभा मतदारसंघात व्हावी अशी इच्छा माझ्याकडे प्रकट केली त्या करीता कोणतीही मदत लागल्यास मला सांगा म्हणून भावना व्यक्त केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर
सदर प्रकल्पामुळे तालुक्यातील शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे तसेच या प्रकल्पामुळे विभागातील कापूस उत्पादक शेतक-यांच्या कापसाला योग्य भाव मिळणार असून विभागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त होणार आहे. भारतीय जनता पार्टी यवतमाळ पुसद जिल्हासमन्वयक, नितीन भुतडा