
मंगरूळ (कारखाना) प्रतिनिधी:- हर्षनंदा वाकोडे
दिनांक. ८ मे २०२५: मंगरूळ येथून तीन किलोमीटर असलेल्या बेलोरा गावातील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक पुरुषोत्तम मांडली यांचे निलंबनाचे आदेश पाच मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सईने आदेश देण्यात आले होते .तसेच पाटणबोरी येथील शाळा हे त्यांना मुख्यालय देण्यात आले आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनीशी गैरवर्तणूक केले असल्याकारणाने शाळा व्यवस्थापना च्या समितीने शिक्षणाधिकाऱ्याकडे असभ्य वर्तणूक बाबत तक्रार केली होती . त्याचाच छढा उघडकीस आल्याने शिक्षणाधिकारी नीता गावंडे तसेच गटशिक्षणाधिकारी पप्पू भोयर यांच्या पथकाने प्रत्यक्ष शाळेत जाऊन चौकशी करून विद्यार्थिनीचे बयान नोंदविण्यात आले होते. यावरून मुख्याध्यापक दोषी असल्याचे निर्देशनास आले. महाराष्ट्र दिनी नागरिकांचा राग अनावर झाले असल्याकारणाने मुख्याध्यापकास बेदम मारहाण करून होंडा शाइन दुचाकी पेटवून दिली होती. त्याप्रसंगी गावकऱ्यांवर गुन्हे दाखल ग्रामीण पोलिसांनी केले होते.
गावाची बदनामी होऊ नये म्हणून गावातील नागरिकांनी शिक्षिका विरोधात तक्रार केली नव्हती. त्यामुळे अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते अशातच चौकशी अहवालात कार्यवाहीची चक्र पुरुषोत्तम मानली यांच्यावर फिरले आहे निलंबनाचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी काढले आहे.