
आदिलाबाद येथील जेके ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक मुकुटबंद येथून चेतक कंपनीचे सिमेंट भरून जळकोट येथे जात असताना माहूर घाटाखालील केरोळी ते धनोडा विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदी पात्रावर असलेल्या पुलावरील खड्ड्यामध्ये टायर फुटून ब्रेक फेल झाल्याने 70 फूट नदी पात्रात कोसळल्याने चालक संतोष यादव राठोड वय 24 वर्षे रा भवानी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ हा गंभीर जखमी झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्याची घटना दि 28 रोजी 6.00 वाजता घडली आहे
आदिलाबाद येथील जेके ट्रान्सपोर्ट कंपनीचे ट्रक क्रमांक एम एच 34 ए बी 4023 हा मुकुटबंद येथून सिमेंट भरून माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रावरील पुलावरून जात असताना येथे असलेल्या खड्ड्यात टायर फुटल्याने त्याचे ब्रेक निकामी होऊन तो मुलाला कठडे नसल्याने पुलावरून नदीत उलटा पडला पुलावरून जात असलेले शेकापूर येथील अशोक कांबळे यांनी घटना बघून आरडा ओरड केल्याने बाजूला बंधाऱ्याचे कामावरील जेसीबी चालकांनी घटना पाहताच जेसीबी घेऊन ट्रक जवळ जात चालकाला ट्रक मध्ये अडकलेला पाहून ट्रकची केबिन तोडणे सुरू केले इतक्यात माहूर पोलिसांना माहिती मिळाल्याने स पो नी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी अमोल गायकवाड सपो उपनि पालसिंग ब्राह्मण पोहेका गजानन चौधरी पोहेका प्रकाश गेडाम पोका पवन राऊत होमगार्ड एस पी भगत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्वांचे मदतीने चालकाला बाहेर काढून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले येथील वैद्यकीय अधिकारी अक्षय वाठोरे यांनी डाव्या हाताचे हाड तीन ठिकाणी मोडून इतर ठिकाणी गंभीर मार लागल्याने प्रथमोपचार करून त्यास यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविले
पैनगंगा नदीपत्रावरील जुन्या पुलावरून वाहतूक सुरू असून या फुलावर खड्डे तसेच कठडे नसल्याने येणारे लाखो भावीक या पुलावरून जीव घेना प्रवास करत असून नवीन पूल तयार होऊनही 100 मीटर रस्त्या अभावी राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला नसल्याने अनेक मान्यवरासह नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अनेक वेळा भेटून निवेदन देऊन मागणी करूनही अद्याप नवीन पुलावरून रस्ता सुरू झाला नसल्याने येणारे लाखो भाविकासह प्रवासी जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करत असून नवीन फुल तात्काळ चालू करत जुन्या पुलाला कठडे बसवावे अशी मागणी होत आहे