
खरिपाच्या पिकावर वन्य प्राण्यांचा ताव : शेतकरी त्रस्त..
ज्ञानेश्वर वायकुळे.
ग्रामीण प्रतिनिधी निंगणुर .
परिसरात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला असून खरीप पिकावर ताव मारत आहेत त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱी करीत आहे परिसरातील शेतकऱ्यांनी भाग बदलत पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेत खरिपाचे पेरणी केली अनेकांनी तर दुबार पेरणीला सामोरे जावे लागले त्यामुळे कुठे पीक उगवले तर कुठे पिकांना डवऱ्याचे फेर बसत आहेत आंतरमशागतीच्या कामाला प्रारंभ झाला पिकावरील रोगराईचे नियंत्रणासाठी तन नाशक फवारणीच्या कामाला गती आली आहे खते बी बियाणे चे बेभाव मजुराचे वाटले दर आणि तन नियंत्रण व अंतर्गत मशागतीला लागणारा खर्च शेतकऱ्यांना परवडनासा झाला आहे खरीप पिक नेमकेच उगवून आली असताना तर काही टिचभर वाढलेली असताना वानराचे आणि निलगाय ( रोह्याचे) कळप त्याला फस्त करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान होत आहे .