
उमरखेड शहरांमध्ये सध्या मोकाट कुत्र्यांचा वावर सर्रास बघावयास मिळत आहे त्यातच आज दुपारी एक वाजता चे दरम्यान डॉक्टर झाकीर हुसेन वार्ड येथील माजी नगराध्यक्षांचे घराजवळील परिसरात वावरत असलेल्या कुत्र्याच्या घोळक्यातील एका कुत्र्याने एका वृद्ध महिलेस चावल्याची घटना घडली आहे.
उमरखेड शहरातील डॉक्टर झाकीर हुसेन वार्ड हा माजी नगराध्यक्षांचा वॉर्ड म्हणून ओळखला जातो आज चे घडीस सदर वार्ड सुख सुविधांपासून खूप वंचित राहत आहे रस्त्यावर घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरलेले आहे जवळच नगरपरिषद उर्दू शाळा आहे या शाळेतील लहान लहान विद्यार्थ्यांना रस्त्यावर जमा असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगार्यास ओलांडून शाळेत जावे लागते रस्त्यावर असलेल्या कचरा संकलनाचा ठिया बदलण्यासाठी नगर परिषदेस वारंवार विनंती करण्यात येऊन सुद्धा परिस्थिती जैसे थे च असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यातच मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे शाळेत जाणारी विद्यार्थी वृद्ध यांना या कुत्र्यांचा अतोनात त्रास होत असल्याने नगरपरिषदेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.