
स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अवनी स्वप्निल चिकाटे हिने तालुका बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या स्पर्धेमध्ये तालुका क्रीडा समन्वयक वैभव मांडवगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्कृष्ट पंच म्हणून अॅड. बजाज सर व श्री. तेला यांनी आपली भूमिका चोख बजावली.
अवनीच्या उत्कृष्ट खेळाची दखल घेत तिची यवतमाळ जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तिच्यासोबतच समकित कुचेरीया व श्रुती शिवाजी भवर हिचीही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.नरेश गंधेवार सचिव विजय जयस्वाल, मुख्याध्यापक डॉ. पी. प्रशांत, गणपत गजलवाडा यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या या यशामागे क्रीडा शिक्षक अशोक सववाके यांनी घेतलेले परिश्रम महत्त्वाचे ठरले आहेत.