
शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी उमरखेड तालुक्यातील देवसरी येथे ऊस पिकांवर मोठ्या प्रमाणावर झालेल्या पांढरीमाशी रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना मार्गदर्शन व उपाययोजना सांगण्यासाठी विशेष परिसंवाद व शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन मा. आमदार किसनरावजी वानखेडे साहेब यांच्या पुढाकाराने तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय उमरखेड यांच्या सहकार्याने संपन्न झाले.शिबिरामध्ये तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी तालुका कृषी अधिकारी श्री अभय जी वडकुते,कृषी तज्ज्ञ डॉ एस.बी.पवार, प्रो.टि.ए.चव्हाण यांनी पांढरीमाशी या कीटकाचे जीवनचक्र, त्याचे पिकांवर होणारे परिणाम, नियंत्रणासाठी वापरावयाचे कीटकनाशकांचे योग्य प्रकार, जैविक नियंत्रणाच्या पद्धती तसेच रोगप्रतिबंधक उपायांवर सखोल मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणी तज्ज्ञांपुढे मांडून थेट सल्लाही घेतला.
या प्रसंगी मी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत निवेदन सादर केले आहे .
शेतकऱ्यांचे हित हेच माझे प्रथम कर्तव्य असून, या संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे, तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे,नवीन रोगाबाबत शेतकऱ्यांना पूर्व माहिती द्यावी, तसेच शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.या वेळी तालुका कृषी अधिकारी श्री अभय जी वडकुते, कृषी तज्ज्ञ डॉ.एस.बी.पवार,प्रो.टि.ए.चव्हाण,सरपंच सौ.मिनाक्षीताई सावतकर, उपसरपंच तथा संचालक कृ.उ.बा.स.गजानन पाटील देवसरकर,माजी संचालक वसंत सहकारी साखर कारखाना प्रदीपराव देवसरकर, पोलीस पाटील देवीदास पाटील, अशोकराव वानखेडे,चंद्रमणी सावतकर,रंगनाथ चेपूरवार,संदीप देवसरकर,बंडू देवसरकर, प्रशांत गुंडारे यांच्यासह शेतकरी बांधव, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.