
दिनांक 14/06/2025 रोजी फिर्यादी रमेशरावजी चव्हाण, वय 65 वर्ष रा.जनुना ह.मु. व्यंकटेश नगर उमरखेड जि. यवतमाळ यांचे फिर्यादवरुन पो. स्टे.उमरखेड येथे अप क्र 433/2025 कलम 303(2) BNS अन्वेय गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्ह्यात मा.पोनि शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली डिटेक्शन बेंच चे प्रमुख पोउपनि सागर इंगळे व डि बी टिम यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या बाजुच्या असलेले सी सी टि व्हि चेक केले असता त्यांना सदर आरोपी हा तेथे येवुन फिर्यादीची मो सा घेवुन जातांना दिसल्यावरुन पुढील सी सी टि व्हि चेक केले असता आरोपी हा पुसद रोडने जात असतांना दिसल्यावरुन सदर सी सी टि व्हि फ्युटेज मधील आरोपी हा दत्तात्रय तुकाराम पवार, वय-35 वर्ष, रा. कल्मुळा ता.उमरखेड जि. यवतमाळ असा असल्याचे निष्पन्न झाले. वरुन सदर आरोपीचा शोध घेतला असता तो त्याचे घरासमोर मो सा सह मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन त्याचे कडुन चोरी गेलेली एक हिरो होंडा कंपनीची प्लेन्डर प्रो मो सा जिचा क MH-29- AG-4177 कि अं 20000/- रुपये चा व हिरो कंपनीची प्लेन्डर मो सा जिचा क MH-29-BG-4738 कि अं 25000/- रुपये अशा वर्णणाच्या दोन मो सा जप्त केल्या आहे.
सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ सा.यांचे मार्गदर्शनाखाली डि बी प्रमुख पोउपनि सागर इंगळे, पोहेका/1186 मधुकर पवार, पोशि/1652 संघशिल टेंभरे, पोशि/1191 निवृत्ती महाळनर, पोशि/928 प्रफुल घुसे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका/458 चंदन जाधव हे करीत आहे.