
रविवार दिनांक 18 मे 2025 रोजी सकाळी अंदाजे चार वाजताच्या सुमारास परजना गावाला लागून असलेल्या उत्तरेस शंकर वाघमारे यांच्या शेतामध्ये लग्न समारंभ होता. लग्नासमारंभा जवळच असलेल्या विहिरीत पडून युवकाचा मृत्यू झाला. या घटनेने घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे.युवकाचे नाव हैबती अमृता बिट्टेवार वय वर्ष 28 राहणार ब्राह्मणगाव.हा मंडप डेकोरेशनच्या कामावर मजुरीने काम करीत होता.मृतक हैबती बिट्टेवार यांच्या पश्चात वडील,आई, दोन भाऊ असा आप्त परिवार आहे.हैबती बिट्टेवार यांच्या दुःखद निधनाने सर्व ब्राह्मणगाववर शोककळा पसरली आहे.या घटनेचा पंचनामा करून व तपास उमरखेड पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संतोष चव्हाण व शिपाई करीत आहेत.