
मंगरूळ (कारखाना)प्रतिनिधी:- हर्षनंदा वाकोडे
दि:१मे २०२५यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत बेलोरा जिल्हा उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये आज सकाळी १०.३० वाजता मुख्याधपक पी. बी. मांडलिक यांना गावकऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली तसेच दुचाकी क्रमांक एम एच २९होंडा शाईन गावकऱ्यांकडून पेटविण्यात आली.
आज महाराष्ट्र दिनानिमित्ती सर्व शिक्षक विद्यार्थी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते .९ व्या वर्गात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रश्नावरून हा प्रकार घडून आला . एस. डी. ओ.डी ओ बेहिसदहाने यांना माहिती मिळताच घटना स्थळावर उपस्थित झाले .मुख्याधपकाला बेदम मारहाण झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले .स्थानिक जमाव व दंगल शांत करण्यासाठी सुरक्षेला पाचारण करण्यात आले .
दरम्यान चार तास पोलिसांनी गावकरी व शिक्षकास विचारपूस केली असता मुख्याधपकाच्या विरोधात कोणत्याच प्रकारची तक्रार केली नाही . त्यामुळे शिक्षकाला ज्याने मारहाण केली त्याच्या वरच गुन्हा नोंद होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले . पुढील तपास हा एस डी. पी. ओ दिनेश बहिसदहाने करीत आहे .