
उमरखेड येथील मागासवर्गीय शासकीय मुलींचे वस्तीगृहात चालू असलेल्या अंधा धुंद कारभारामुळे येतील महिला गृहपालाला नुकतेच निलंबित करण्यात आलेले आहे. आणि त्यांच्या जागी रेणुका बोंतावार यांना प्रभार दिल्याची खात्रीदायक माहिती आहे .आज दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी मागासवर्गीय शासकीय मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिले असता .या वस्तीगृहाच्या प्रभारी गृहपाल हजर नव्हत्या त्या पुसद वरून रोज ये जा करतात असे कळते. दुपारचे बारा वाजले तरी गृहपाल उमरखेडच्या वस्तीगृहात आल्याच नव्हत्या त्यामुळे येथील वस्तीगृह वाऱ्यावर सुटल्या सारखी अवस्था आहे . याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे .