
नांदेड जिल्ह्याचे पहिले माजी खासदार दिवंगत हरिहरराव सोनुले यांचे ज्येष्ठ चिरंजीव हदगावच्या अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त आदर्श विद्यार्जन मंडळ द्वारा संचलित पंचशील हायस्कूलचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारणी सदस्य,हदगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील हरिहरराव सोनुले यांचा वाढदिवस वडाचे वृक्ष लावून उत्साहात साजरा करण्यात आला.
जीवनांकुर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव हरिश्चंद्र चिल्लोरे यांच्या द्वारे हदगाव तालुक्यातील पळसा खांडित मानवाडी ते पळसा दरम्यान हायवेलगत पंचवीस वड वृक्षाचे झाडे लावून उत्साहात साजरा करण्यात आला असून झाडाची देखभाल व त्या झाडांना नियमित पाणीपुरवठा संस्थे द्वारे करण्यात येत आहे.वृक्ष लागवड करताना पंचशील विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार अनिल दस्तुरकर,संदीप ढोले,
जीवनांकुर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ.ऋषिकेश चिल्लोरे,सचिव हरिश्चंद्र चिल्लोरे,वृक्षमित्र निवृत्ती वानखेडे,श्रीमती रेणुकाबाई टारफे,पांडुरंग टारफे,रितेश वानखेडे, गंगाराम माखणे,मनीषकुमार चौधरी,ओमकार टारफे आधी वृक्ष मित्रांनी सोनुले यांचा वाढदिवस वडाचे झाडे लावून उत्साहात साजरा केला.
गेल्या वर्षीही सुनील सोनूले यांचा वाढदिवस पळसा शिवारात वड आणि पिंपळ वृक्षाचे झाडे लावून उत्साहात साजरा करण्यात आला होता ती झाडे आता चांगलीच मोठी झाल्याने पंचशील विद्यालयाचे पर्यवेक्षक अनिल दस्तूरकर यांनी जीवनांकुर सेवाभावी संस्थेचे आभार मानले.