
मंगळवार दिनांक 25 मार्च 2025 रोजी पासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरखेड अंतर्गत होत असलेल्या सन 2022 23 च्या प्रशासकीय मान्यता नुसार काम वेळेत पूर्ण न करून घेतल्यामुळे उपविभागीय अभियंता, सहाय्यक अभियंता,दक्षता व गुण नियंत्रण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय सेवेतून तात्काळ बडतर्फ करावे यासाठी मुळावा येथील संतोष देवसिंग आडे वाहतूकदार हे आपल्या विविध मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसलेले आहेत.