
दिनांक 25 मार्च रोजी भीम टायगर सेना यवतमाळ/ उमरखेड च्या वतीने उमरखेड तालुक्यातील अवैध जुगार मटका दारू गुटखा रेती मुरूम उत्खनन इत्यादी धंदे कायमस्वरूपी बंद करण्याबाबत या प्रमुख मागण्या घेऊन आमरण उपोषण उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर भीम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे हे दिनांक 24 मार्च रोजी बसले होते.
उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ यांना संविधान रक्षक, कायदे तज्ञ, फायर ब्रँड वक्ते दादासाहेब शेळके (संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भिम टायगर सेना) यांच्या सोबत सकारात्मक चर्चा करून ठाणेदार यांनी सर्व मागण्या मान्य करून लेखी पत्र दिल्यामुळे सदर आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
•लेखी पत्र:-
आज दिनांक 24/03/2025 पासून मा. उप.वि.पोलीस अधिकारी साहेब उमरखेड यांचे कार्यालयासमोर उपोषणास बसले असुन, आज पर्यत पोलीस स्टेशन उमरखेड अवैध्य व्यवसाय करणारे यांचे विरुध्द मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात आलेली आहे. यापुढेही पोलीस स्टेशन उमरखेड परिसरात कोणतेही अवैध्य धंदे चालणार नाही याबाबत सर्व बिट अधिकारी /बिट अंमलदार यांना अवैध्य धंद्यावर कार्यवाही करुन त्याचे समुळ उच्चाटन करण्यासंबंधाने वेळोवेळी लेखी व तोंडी सुचना दिल्या असुन अशा प्रकारे शहरात लपुन छपुन चालणा-या अवैध्य मटका, जुगार, दारु बाबत माहीती काढून आम्ही व्यक्तीशः तसेच बिट अधिकारी /अमंलदार मुखबिर मार्फत माहीती घेवुन शहरात व परिसरात यापुढे अवैध्य व्यवसाय चालणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येते. असे लेखी पत्र देऊन ठाणेदार शंकर पांचाळ यांनी आश्वासन देण्यात आलेले आहे.
यावेळी उपोषणकर्ते शामभाऊ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना तथा मुख्य संपादक जनहित24न्यूज चॅनल, दादासाहेब शेळके, करण भरणे उपजिल्हाप्रमुख भीम टायगर सेना, यवतमाळ, कैलास कदम उमरखेड तालुका प्रमुख, पत्रकार सिध्दार्थ दिवेकर शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड, बबलू भालेराव मुख्य संपादक महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल, पत्रकार डॉ. आयुब पठाण, पत्रकार शेख इरफान, पोलीस कर्मचारी विजय पतंगे, बोधीवृक्ष कदम इत्यादी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.