
दि.8 /3/2025 रोजी ओबीसी समाजाला आपल्या हक्काबाबत जागृत करणे ही महत्त्वाची उद्दिष्टे ठेवून प्रशिक्षण प्रबोधन व संघटन या तीन माध्यमातून समाजातील प्रत्येकाला ओबीसी साक्षर करणे हे ध्येय आहे तसेच ओबीसी मध्ये जातीय चेतना नाहीशी करून वर्गीय चेतना निर्माण करणे सामाजिक समता निर्माण होण्यासाठी सर्व समाज घटकांना समान प्रतिनिधित्व मिळणे यासाठी संघटनेच्या माध्यमातून अल्पकालीन व दीर्घकालीन कार्यक्रम आखण्यात आले आहे सोबतच मंडल आयोग लागू होऊन 34 वर्षानंतरही ओबीसी प्रवर्गाचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत सदर प्रश्न मार्गी लावण्याकरिता तसेच ओबीसीचे संघटन मजबूत करण्यासाठी आपली सहसचिव पदी निवड केली आहे. आपला संघटन भारतीय संविधानावर विश्वास ठेवून काम करते तसेच संघटनेत पक्ष जात लिंग निरपेक्ष काम केल्या जातो संघटनेच्या सर्व दूर विस्तार व्हावा यासाठी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाकडून संघाकडून आपली निवड करण्यात आली त्यामुळे अनिल भाऊ जयसिंगपूर यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.