
शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष माननीय ना.श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून उमरखेड येथील बंग लेआउट प्रांगणात उमरखेड महागाव तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट )व शिवसेना (उबाठागट), माजी जिल्हा परिषद सदस्य,माजी पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक व हजारो कार्यकर्ते पदाधिकारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये भव्यपक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमाला श्री प्रा. डॉ.अशोक उईके मंत्री आदिवासी विकास विभाग तथा संपर्क मंत्री, ना.माननीय श्री मदनभाऊ येरावार माजी मंत्री तथा भाजपा नेते, माननीय श्री संजय जी कुटे, माननीय परम पूजनीय श्री बाबुसिंग महाराज आमदार तथा महंत पोहरागड आमदार तथा माजी मंत्री, माननीय श्री नितीन भाऊ भुतडा सदस्य नोंदणी प्रमुख पश्चिम विदर्भ, माननीय श्री महादेवराव सुपारे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, उत्तमरावजी इंगळे अनुसूचित जमाती प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, माननीय श्री किसनरावजी वानखेडे आमदार उमरखेड महागाव विधानसभा, माननीय श्री निलयभाऊ नाईक माजी आमदार विधान परिषद, माननीय श्री नामदेवराव ससाने माजी आमदार, माननीय डॉक्टर आरती ताई फुफाटे विधानसभा प्रभारी, व अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे