
आयटीआय कॉलेजच्या विध्यार्थ्यांकडून तसेच शहर तथा ग्रामिण भागातून विजे संदर्भात असंख्य तक्रारी वारंवार प्राप्त होत असल्याने उमरखेड विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे, यवतमाळ-पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी दि.11 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता विडुळ प्राथमिक आरोग्य केंद्रास आकस्मिक भेट देऊन रुग्णालयातील लसीकरण कक्ष, औषध वितरण कक्ष, औषध भांडार, अंतररुग्ण विभाग, प्रसूती कक्ष, प्रयोग शाळा आदींसह परिसराची पाहणी करीत कर्मचाऱ्यांच्या हजेरी बुकाची सुध्दा पडताळणी केली.
वैधकीय अधिकारी डॉ. वाटाणे व डॉ. जयराम बस्सी यांनी इमारत कालबाह्य झाल्यामुळे नवीन इमारतीचे बांधकाम करण्याची मागणी यावेळी आमदार किसनराव वानखेडे व यवतमाळ-पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांचेकडे केली.
यावेळी विडुळ येथे माजी जिप सदस्य संदीप हिंगमीरे, माजी सरपंच विकास मुलुंगे, पत्रकार डॉ. शिवचरण हिंगमीरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच हुतात्मा मधुकरराव चौधरी आयटीआय विद्यालयात शिक्षक वृंद तथा प्राचार्य उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारीवरून आमदार वानखेडे यांनी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली असता प्राचार्य सुद्धा गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. अपुरा कर्मचारी वर्ग, पिण्याच्या पाण्याची उणीव, ग्रंथालयाची अनुपलब्धता, अस्वच्छता आढळल्याने आमदार वानखेडे यांनी चांगलेच धारेवर धरले व “तीन दिवसात सुधारणा न झाल्यास आपण स्वतः कार्येवाहि करणार असल्याचे” बजावून सांगितल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी आमदार किसनराव वानखेडे यांनी तेथील सर्व ट्रेडच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
तदनंतर विद्युत विभागासंदर्भात नागरिक त्रस्त असल्याने महावितरण कार्यालयास ही आकस्मिक भेट देऊन महावितरणचे पुसद विभागीय कार्येकारी अभियंता चव्हाण यांच्या समवेत बैठक घेतली.
शहर तथा ग्रामिण भागातील विजेचा कायमस्वरूपी लपंडाव, कमी व्होल्टेज, विजबिला संदर्भातील अनियमितता व अवाजवी बिलाची आकारणी तसेच कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी यासर्व बाबतीस हेरून महावितरणच्या कार्येकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता वरिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ तंत्रज्ञ व विद्युत सहाय्यकांची कमालीची कानउघडणी करीत जनसामान्य नागरीकांशी पारदर्शक व्यवहार करणे तसेच नागरिकांना नियमितपणे विद्युत पुरवठा करण्यासंदर्भात सूचना केल्या.
भेटी दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्रपणे बैठका घेऊन त्यांच्या अडीअडचणी सुद्धा आ.वानखेडे यांनी आवर्जून जाणून घेतल्या.
ग्रामिण भागातील जनसामान्यांना सहज वैधकीय सुविधा, पूर्णवेळ विद्युतपुरवठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या ही सूचना दिल्या.
वरील तिन्ही कार्यालयात माननीय पंतप्रधान व महामहिम राष्ट्रपतींच्या प्रतिमा दिसून आल्या नसल्याने प्रचंड खवळलेल्या आमदार महोदयांनी दोन्ही प्रतिमा लवकरात लवकर लावण्याच्या सूचना देत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
◆बातमी समवेत फोटो आहे.–