
लोकहित लाईव्ह न्युज संपादक विजय कदम
उमरखेड तालुक्यातील पोलिस दलात प्रशासकीय कारणास्तव तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये बिटरगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार एपीआय संतोष मनवर यांची एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) येथे बदली करण्यात आली आहे. तर उमरखेड पोलिस स्टेशनचे एपीआय कैलास भगत यांची बिटरगाव पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.एलसीबीचे एपीआय सुगत पुंडगे यांची वसंतनगर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी मंगळवार, दि. २८ जानेवारी रोजी बदली आदेश काढले. प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या आहेत
एपीआय संतोष मनवर हे यापूर्वीही स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांना यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारांची इतंभूत माहिती आहे. त्यांनी यापूर्वीही दमदार कामगिरी केली असून अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांची पुन्हा एलसीबीत नियुक्ती झाली असून अनेक गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
यवतमाळ जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्र पोलिस कायदा-१९५१ मधील कलम २२ (न) नुसार, यवतमाळ जिल्हा पोलिस दलातील नमूद पोलिस अधिकारी त्यांच्या
नावासमोर दर्शविण्यात आल्याप्रमाणे प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या नेमणुका करण्यात येत आहेत. बदली, नेमणूक करण्यात आलेल्या पोलिस अधिकारी यांनी तत्काळ त्यांचे नेमणुकीचे ठिकाणी हजर व्हावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.