
सहकार क्षेत्रात अल्पावधीत प्रचंड यश मिळवणाऱ्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेटने 6 राज्यात कार्यक्षेत्र विस्तारले असून, 2325 कोटी ठेविचा टप्पा पार करून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे , अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी नेहमी तत्पर असलेल्या या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी कार्यक्रम सातत्याने घेतले आहे. गोदावरी अर्बन उमरखेड शाखेच्या वतीने दिनांक :-02/01/2025 रोजी गोदावरी अर्बन संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय सौ.राजश्रीताई पाटील मॅडम,संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आदरणीय श्री.धनंजय तांबेकर सर ,उपमहाव्यस्थापक आ.सुरेखा दवे मॅडम,सहाय्यक महाव्यवस्थापक आ.श्री रवी इंगळे सर,विपणन व्यवस्थापक आ.श्री महेश केंद्रे सर यांच्या संकल्पनेतून श्री.उत्तमश्लोक वाङमय मंडळ वाचनालयास शतक पूर्ती निमित्त वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आणि वाचक आणि ग्रंथ संपदा यांच्यातील जवळीक वाढण्यासाठी ग्रंथालय संचालक मुंबई यांच्या आदेशप्रमाणे श्री उत्तम श्लोक मंडळ वाचनालयात वाचक मेळावा संपन्न तसेच गोदावरी अर्बन बँक तर्फे संगणक संच, पंखे तसेच पुस्तक कपाट भेट देण्याचा व लोकार्पण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी गोदावरी अर्बनचे विपणन व्यवस्थापक श्री. महेश केंद्रे सर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी बोलताना श्री .महेश केंद्रे सर म्हणाले की, मनुष्य मृत्यपर्यंत विद्यार्थीच असतो. म्हणूनच त्याच्या जीवनात ग्रंथांचे अनन्यसाधारण महत्व आहे. विचार शुन्य व्यक्तीमत्वाला उजळून टाकण्यासाठी वाचन संस्कृती वृध्दींगत होणे काळाची गरज आहे .कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी प्रा.श्री.तानाजी नरवाडे सर यांनी भूषविले,उमरखेड शाखेचे शाखाव्यवस्थापक श्री.धनंजय क्षीरसागर सर यांनी संस्थेची माहिती देऊन अवगत केले. श्री. उत्तमश्लोक वाचनालायचे अध्यक्ष श्री.अरविंद पांडे सर तसचे सचिव श्री.दीपक देशमुख सर यांनी वाचनालयाच्या इतिहास व प्रगतीची माहिती देऊन अवगत केले तसेच गोदावरी अर्बन संस्थेनी दिलेल्या भेटवस्तू बद्दल संस्थेचे आभार मानले व वाचनाचे महत्त्व काय असते हे वाचनालयाचे सदस्य श्री.अशोक चौधरी सर यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.भरत कुलकर्णी सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऍड श्री.रमेश भागवत सर यांनी केले, कार्यक्रमास वाचनालातील सदस्य,सभासद व वाचकांची हजेरी होती व त्यांनी गोदावरी अर्बन यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याची स्तुती केली व संस्थेच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या.