
विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणी योजनेस मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळेशहर व तालुक्यातील महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी तसेच शिवसेनेत जास्तीत जास्त महिलांचा सहभाग वाढावा , मान सन्मानासह त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी तालुका शिवसेनेच्या वतीने दिनांक 12 जानेवारी रोजी लाडकी बहीण मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्थानिक विश्रामगृह येथे रोजी शिवसेनेकडून बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले .
सदर मॅरेथॉन स्पर्धा ही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुसद रोडवरील हुतात्मा स्मारक चौकापर्यंत आयोजित करण्यात आली आहे .दि .12 जानेवारी रोजी शिवाजी महाराज चौक पुसद रोड वरील हुतात्मा चौक दरम्यान होणार आहेत.सदर स्पर्धेसाठी महिलांच्या अ व ब गटात विभागणी आली आहे . यामध्ये अ गटात 18 ते 24 व ब गटात 24 ते 35 वयोगटातील महिलांना स्पर्धेसाठी प्रवेश मिळणार आहे .या स्पर्धेत 3 बक्षीसे जाहीर करण्यात आली असून प्रथम 11 हजार रुपये,दुसरे 7 हजार रुपये ,तिसरे पाच हजार रुपये असे बक्षीस शिवसेना (शिंदे )गटाकडून ठेवण्यात आले . या स्पर्धेच्या उद्घाटक पालकमंत्री संजय राठोड यांच्या सुविद्य पत्नी शितल राठोड ,राजश्री हेमंत पाटील,महिला संपर्कप्रमुख कालींदा पवार ,महिला जिल्हा प्रमुख वैशाली मासाळ ,शुभांगी देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .संयोजक सतीश मुडे व संकल्प दामोदर इंगोले यांच्या संकल्पनेतून शहरातील व तालुक्यातील महिलांचा शिवसेनेत सहभाग वाढावा या उद्देशाने ही स्पर्धा ठेवण्यात आली असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख एडवोकेट संजय जाधव यांनी पत्र परिषदेत सांगितले .यावेळी श्रीमती मंजुषा ताई अनिल नरवाडे ,सीमा संदीप ठाकरे,कल्पना पुरी ,काजल दामोदर इंगोले, ज्योती जोगदंड,प्रियंका कदम,कुसुम विनायक मरडकर,संगीता काळे नंदा कांबळे ,अंबिका सुरोशे,आरती काळे,छाया गजभार आदि महिलांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला .या स्पर्धेसाठी निशुल्क प्रवेश राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले .
परिषदेला एडवोकेट संजय जाधव ,तालुका शिवसेनाप्रमुख प्रवीण पाटील मिरासे ,ज्येष्ठ शिवसैनिक रविकांत रुडे,कैलास कदम ,संदीप ठाकरे महिला शहर प्रमुख सपना चौधरी ,सपना चौधरी ,साधना जाधव,बालयोगी अनंतराज अमृते,नितीन कलाने,कृष्णा जाधव,छोटू शर्मा,विलास हरकरे ,एडवोकेट अजय पाईकराव ,प्रसिद्धी प्रमुख राजू गायकवाड ,दामोदर इंगोले,विष्णू मते ,विनायक मारोडकर ,प्रसाद गोंधळी आदींची उपस्थिती होती .