
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था, पुसद संचलित कृषी महाविद्यालय, उमरखेड यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिराचे आयोजन दिनांक २६ डिसेंबर ते ०१ जानेवारी २०२५ दरम्यान ग्राम बारा येथे करण्यात आले होते. ग्राम बारा ता. उमरखेड. जि. यवतमाळ येथे समारोपीय समारंभ आयोजित करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हनून मा .श्री शिवाजीराव माने अध्यक्ष आपला जीन प्रेस उमरखेड व मा.श्री डॉ. आर .एम . खान प्राचार्य कृषि महाविद्यालय उमरखेड यांच्या समवेत गावचे सरपंच मा.सौ. साधनाताई हरणे , उपसरपंच मा.श्री नागोराव हरणे व कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक श्री.एस.के.चिंतले व इतर मान्यवर उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे चेअरमन मा.डॉ. विजयराव माने ह्यांच्या मार्गदर्शनात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम उपस्थीत मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वच्छतेचे पुजारी राष्ट्रसंत गाडगे बाबा व हरित क्रांतीचे जनक कृषीरत्न शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेच पुजन व दिप्रज्वलन करुण राष्ट्रिय सेवा योजना विशेष शिबिराचे समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या विशेष शिबिरादरम्यात दि.३१/१२/२०२४ रोजी मा.डाॅ. संदिप हाडोळे संचालक, विद्यार्थ्यी कल्याण अधिकारी व कार्यक्रम समन्वयक डाॅ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी सद्ईच्छा भेट दिली. हे विशेष ज्यात त्यांनी सात दिवसाच्या शिबिराचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व नियोजकांचे कौतुक केले. या राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिराचे उद्घाटनं उमरखेड – महागाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री.किशनरावजी वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना सामुहिक गीत गायन करून सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागतगीत गावून स्वागत केले व तद्ंतर,कृषी महाविद्यालय उमरखेड चे रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी, श्री.व्ही.बी.शिंदे. यांनी राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरा दरम्यान नियोजित सामाजिक, सांस्कृतिक, महाविद्यालयातील विविध उपक्रमाची प्रदर्शनी, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियान, अंधश्रद्धा निर्मुलन, महिला सबलीकरण, सायबर क्राइम, शोष खड्डे, पाटबंधारा, विद्यापीठातील नवीन तंत्रज्ञान व अवजारे, प्राथमिक ग्रामीण सर्वेक्षण तथा रक्तक्षय तपासणी व शेतकऱ्यांचा सामजिक आर्थिक स्तर, लम्पिरोग या विषयावर कार्यशाळा माहिती संकलन व इतर कार्यक्रम संदर्भात सात दिवशीय निवासी विशेष शिबिरात जे उपक्रम राबविले त्या सर्व गोष्टीना उजाळा दिला. आपल्या समारोपीय पर भाषणामध्ये माननीय श्री.शिवाजीराव माने यांनी मार्गदर्शन करत राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिराचे महत्त्व व गावा मध्ये केलेल्या श्रमदाना बद्दल कौतुक केल. मा. डॉ. आर.एम .खान यांनी युवकांनी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राष्ट्रनिष्ठा ,राष्ट्रप्रेम व समाजसेवा याची जाणिव ठेवावी असे मार्गदर्शन केले कृषि महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक श्री.एस.के .चिंतले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शिबीर सुनियोजित पणे पार पडल्या बद्दल सर्व स्वयंसेवकांचे व राष्ट्रीय सेवा योजना अधिकाऱ्यांचे आभार मानले. उपरोक्त समारोपिय समारंभास गावचे सरपंच मा. सौ.साधनाताई हरणे उपसरपंच श्री.नागोराव हरणे, तसेच श्री.दत्तराव नारायण सुरोशे, तं.मु.अध्यक्ष ग्राम.बारा. व पोलीस पाटील व जि.प.उच्च प्रा.शाळा. ग्राम. बारा.माजी, मुख्याध्यापक श्री ठाकरे सर व माजी शिक्षक देशमुख सर तसेच विजय मुंगे सर व शाळेतील शिक्षक, आदी मान्यवर व ग्रामवासीयांची उपस्थिती लाभली. तसेच कृषी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक ए. एस.राऊत, के. व्ही. आगे, ए बी तामसेकर, टी.ए. चव्हाण, सहाय्यक प्राध्यापिका शितल गजभिये, पल्लवी घोटेकर तथा सहाय्यक विजय अलट यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक निखील राऊत यांनी केले तर आभार माहेश्वरी सुरोशे हिने मांडले. सदरील कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर चे ४० स्वयंसेवक व ग्राम बारा चे ग्रामवासी यांचे विशेष सहकार्य लाभले.