राज्यात गुटखा निर्मिती आणि विक्री करण्यास कायदेशीर बंदी असूनही, 13डिसेंबर रात्रीला आटो मधुन सुगंधीत तंबाखुची अवैध वाहतुक होणार आहे.अशा गोपनीय माहीतीवरून बिटरगाव ठाणेदार यांनी आपल्या टीम सोबत सिताफिने सापळा रचुन सोईट ते ढाणकी रोडवर एक पिवळया रंगाचा मालवाहु ऑटो मध्ये पाच लाख चाळीस हजाराचा गुटखा पकडला.
या कारवाईमध्ये,अल्फा महीन्द्रा ऑटो चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव तौफिक खान फकीर खान( ३५ ),रा. जामा मस्जिद वार्ड उमरखेड असे सांगितले व त्याच्या ताब्यातील सदर तीन चाकी अल्फा महीन्द्रा ऑटो क्र. एम एच ०३ ए एब ७६३६ त्याचे मालकिचे असल्याचे सांगीतले वाहणाची पाहाणी केली असता पाच लाख चाळीस हजार रुपयांचा गुटखा पोलिसांच्या हाती लागला.
अवैध वहातुक करण्यासाठी वापरण्यात आलेला अल्फा महीन्द्रा ऑटो क्र. एम एच ०३ ए एच ७६.३६ याची किंमत अंदाजे १,६०,०००/- असा एकूण ७,००,०००/रू चा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला. विनापरवाना व प्रतिबंध असलेला जर्दा तम्बाखु विक्री करीता बाळगुन असतांना मिळवून आला व जप्त करून आरोपी विरूध्द अन्न व सुरक्षा व मानदे कायदा सन २००६ नियम व नियमने २०११चे कलम २६(२) कलम २७, कलम ३०(२) (अ), कलम नुसार कार्यवाही करण्याची प्रक्रीया सुरू केली आहे.
सदरची कार्यवाही कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, सी रजनिकांत उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शनात ठाणेदार संतोष मनवर, पुरवठा निरीक्षक अमितकुमार उपलप अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व प्रशासण यवतमाळ पो. उप.नि. शिवाजी टिपुणे, पोहेकों रवि गिते, पोना देविदास हाके, पोकों निलेश भालेराव, बालाजी मस्के व प्रविण जाधव यांनी केली पुढील तपास पो उप नि. शिवाजी टिपुर्णे हे करीत आहे.