विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
उमरखेड महागाव विधानसभा मधील विधानसभेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची उमेदवारी सामाजिक कार्यकर्ते साहेबरावजी कांबळे यांना मिळाली आहे. साहेबराव कांबळे हे गेल्या दोन वर्षापासून या मतदार संघात ग्राउंड व लेवल वर काम करीत असून त्यांनी अनेक लोकांची जवळीक साधलेली आहे. प्रत्येक समाजातल्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये त्यांनी हिरीरीने भाग घेतलेला आहे. या विभागामध्ये त्यांनी आरोग्य शिबिर, नेत्र शिबिर, असे अनेक सामाजिक उपक्रम घेऊन समाजासाठी सेवा केलेली आहे. अनेक गोरगरिबांना त्यांनी शिक्षणासाठी असो की कोणतीही मदत असो मदत केलेली आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे बौद्ध समाजामध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश नवी उमंग दिसून येत आहे. साहेबराव कांबळे यांना तिकीट मिळाल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदन आचा वर्षाव होताना दिसत आहे.