उमरखेड येथील उप माहिती अधिकारी श्री गजानन परटके यांनी शहरी व ग्रामीण पत्रकारात तथा विशिष्ट दैनिक पत्रकार व साप्ताहिक तथा यूट्यूब चैनल या पत्रकारांमध्ये भेदभाव करून निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मिटींगला बोलावले नसल्यामुळे संतप्त झालेल्या संयुक्त पत्रकार यूट्यूब चैनल डिजिटल मीडिया व साप्ताहिक पत्रकार संघाच्या पत्रकारांनी उप माहिती अधिकारी गजानन परटके यांच्या विरोधात जाहीर एल्गार पुकारला आहे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयुक्त कडून विविध प्रोग्राम विधानसभा मतदारसंघ वाईज राबवले जातात त्याची माहिती सर्व पत्रकारांना देणे क्रमप्राप्त असताना उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांची दिशाभूल करून विशिष्ट बिग बॅनरच्या पत्रकारांनाच मिटींगला बोलवणे व बाकी साप्ताहिक यूट्यूब चैनल डिजिटल मीडिया च्या पत्रकारांत भेदभाव करून डावलने ही अतिशय गंभीर बाब आहे निवडणुकीच्या दृष्टीने पत्रकार हा पत्रकार आहे माध्यमांचा कोणताही प्रतिनिधी असो त्याला निवडणुकीबाबतची माहिती देणे उप माहिती अधिकारी व उपविभागीय निवडणूक अधिकारी यांचे कर्तव्य आहे त्यामुळे पत्रकारात असा कोणताही भेदभाव न करता सर्वच कॅटेगिरीच्या पत्रकारांना निवडणूक कार्यक्रमाची माहिती देणे बंधनकारक आहे त्याबाबत होणाऱ्या सर्वच मिटींगला पत्रकारांचे स्वरूप व कॅटेगिरी न पाहता त्यांना बोलवायला पाहिजे असे असतानाही उप माहिती अधिकारी गजानन परटके यांनी विशिष्ट पत्रकारा सोबत ओली पार्टी करून पत्रकारात भेदभाव केल्यामुळे त्यांची उमरखेड वरून हाकलपट्टी करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन संयुक्त पत्रकार संघ युट्युब चॅनेल डिजिटल पत्रकार व साप्ताहिक पत्रकार संघाच्या पत्रकारांनी राज्य निवडणूक आयुक्त मुंबई यांना दिल्याची माहिती संपादक इरफान शेख यांनी जय राज सिंहासन ला दिली आहे ते पुढे म्हणाले की राज्य निवडणूक आयुक्तांनी जर पत्रकारात भेदभाव करून आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या उपमाहीती अधिकारी गजानन परटके यांची बदली केली नसल्यास आम्ही सर्व पत्रकार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रशासनाला दिल्याचे सांगितले*
*सदर निवेदनाच्या प्रतिलिपी राज्य व केंद्र निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत निवेदन देण्याकरिता सर्वश्री संपादक इरफान शेख रितेश पाटील कदम सुरेंद्र दळवी सुनील ठाकरे गजानन वानखेडे अवधूत खडककर स्वप्निल मगरे सय्यद रहीम रजा ज्ञानेश्वर लोखंडे तहेसीन शेख सय्यद खाजाभाई शुद्धोधन दिवेकर प्रभाकर पाईकराव बबलू भालेराव मुजीब लाला फिरोज लाला इत्यादी पत्रकार उपस्थित असल्याची माहिती संपादक शेख इरफान यांनी दिली या अगोदरही आचारसंहिता लागू झाल्यानंतरही शहरातील व तालुक्यातील राजकीय पक्षाचे बॅनर पोस्टर व प्रचार पत्रके काढण्यात आली नव्हती त्याकडे निवडणूक अधिकारी तहसीलदार व उपमाहिती अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे कर्तव्यात कसूर केली म्हणून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार राज्य निवडणूक अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना दर्पण पत्रकार संघ युट्युब चॅनेल व साप्ताहिक संघाच्या पत्रकारांनी केली होती तरी देखील अद्याप उमरखेड विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात व शहरी भागात अनेक ठिकाणी राजकीय पक्षाचे व विविध राजकीय पक्षातील नेत्यांचे प्रचाराचे बॅनर पोस्टर व भिंती पत्रके वाहनावरील प्रचार पत्रके अद्याप काढण्यात नाही आली विविध स्तरावरून पत्रकार व नागरीक राज्य व केंद्र निवडणूक आयुक्त व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना तक्रारी करीत आहेत कारवाई मात्र थंड बसत्यात आहे पत्रकार व नागरिक आदर्श आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारी केंद्र व राज्य निवडणूक आयुक्तांना करीत असताना उमरखेड विधानसभा मतदारसंघ 82 चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उप माहिती अधिकारी काय कर्तव्य करीत आहेत? हा प्रश्न उमरखेड तालुक्यातील व शहरातील मतदारात चर्चिल्या जात आहे त्याचप्रमाणे उप माहिती अधिकारी माहिती देण्यास कुचराई करत असल्याचे पत्रकारांच्या तक्रारीवरून स्पष्ट होत आहे यावरून नव्याने आलेला उप माहिती अधिकारी हा वादग्रस्त ठरला आहे याची गंभीर दखल राज्य निवडणूक आयुक्त व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी तथा जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी घेऊन उप माहिती अधिकारी गजानन परटके यांची उमरखेड येथून हकालपट्टी करावी अशी माध्यमांच्या विविध पत्रकारांची मागणी जोर धरीत आहे.