विजय कदम लोकहित न्युज व पोर्टल
ब्राम्हणगाव येथील 33 के व्ही उपकेन्द्रात वॉचमन म्हणून कार्यरत असलेले सुनिल उर्फ पप्पू अशोक लोणे वय 40 वर्षे रा. ब्राम्हणगांव यांचे दि 19 ऑक्टोंबर रोजी नांदेड येथे खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान अखेर 7 व्या दिवशी निधन झाले दि. 12 ऑक्टोंबर रोजी
मृत्तक सुनिल हा दुपारी 3 वाजताचे सुमारास हरदडा येथून स्कुटी या वाहनाने गजानन सयाजी श्रोते या मित्रा समवेत ब्राम्हणगावकडे येत असतांना गायपांदन पुलाजवळ वाहन रस्त्याच्या कडेवरील नाल्यात कोसळले यात सुनिलच्या डोक्याला व तोंडावर गंभीर मार लागला. सोबत असलेल्या श्रोते नामक युवकालाही जबर दुखापत झाली होती. गंभीर जखमी अवस्थेत सुनिल
व गजानन श्रोते यांना नातेवाईकांनी तत्काळ उमरखेड येथे रुग्णालयात दाखल केले असता सुनिलची प्रकृती गंभीर असल्या कारणाने डॉक्टरांनी त्यास नांदेड येथे दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यावरून त्यास नांदेड येथील क्रिटीकल हॉस्पीटलमध्ये दाखल केले असता अखेर 7 व्या दिवशी दि. 19 ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री 1 वाजताचे सुमारास त्याचा उपचारा दरम्मान मृत्यु झाला ही वार्ता गावामध्ये कळताच गावात शोककळा पसरली मृत्तक सुनिलच्या मागे पत्नी दोन मुले आई वडील भाऊ बहिनी असा मोठा आप्त परिवार आहे मृत्तक सुनिल हा ब्राम्हणगांव येथील 33 केव्ही उपकेन्द्रात वॉचमन म्हणून कार्यरत होता.