रवि राठोड वाकान प्रतिनिधी (लोकहित लाईव्ह न्युज प्रतिनिधी)
महागांव ः पं समीती अंतर्गत येत असलेल्या व डोंगराळ भागात वसलेल्या मौजा कोदंरी तां महागांव येथे १ ते ५ पर्यंत वर्ग वारी आहे आणि प्रत्येक वर्गासाठी शासनस्तरावरून वर्गवारी नुसार पाचही वर्गांना विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून शासन शिक्षणाविषयी कोट्यवधी खर्च करीत आहे मात्र सततच शिक्षक रुंद शाळेवर गैरहज आणी कोनत्या न कोणत्या कारणास्तव कोदंरी येथील शाळेत दांडी मारत असल्याची तक्रार ग्रा पं सदस्य आकाश चव्हाण यांनी काल दिनांक १८ आकटोबंर रोजी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे विध्यार्थ्यां हा देशाचा भविष्य असुन गुरूजनांकडुन त्यांना दर्जेदार शिक्षण न मिळाल्यास त्यांचे भवितव्य पाण्यात आल्या शिवाय राहणार नाही आणि देशाचे उज्वल भविष्य घडणार नाही हे कोदंरी येथील जिल्हा परिषद शाळेमधुन पाहायस मिळत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून त्यांचे भवितव्य मातीमोल होन्याची सभंवता आहे शिक्षक वर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी व शाळेचे कारभार पारदर्शक चालविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोईसुविधा मिळण्यासाठी जि परिषद व शासकीय स्तरावरून शाळा समिती अध्यक्षांची निवड केली मात्र अध्यक्ष हे नावापुरतेच असुन त्यांचे लक्ष मात्र शाळेकडे दिसून येत नसल्याने या शिक्षक वर्गाना दांडी मारायची चालना मिळत असल्याचे बोलल्या जात आहे शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडे संबंधित शिक्षकांच्या तक्रारी केल्यास उडवाउडवीची उत्तरे देत सतत शाळेकडे दुर्लक्ष केल्या जात आहे त्यामुळे सतत शिक्षक वर्ग शाळेवर गैरहजर राहत असल्याने आकार चव्हाण हे एक पालक असुन कोदंरी येथील ग्रां पं प्रतिनिधी असल्याने त्यांनी रीतसर तक्रार दाखल करून शाळेला दांडी मारत गैरहजर राहत असलेल्या शिक्षकांवर कायदेशीर कार्यवाहीची मागणी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ सह गटशिक्षण अधिकारी साहेब यांचेकडे तक्रार दाखल केली आहे