विजय कदम लोकहित लाईव्ह न्यूज संपादक
दि. 12/10/2024 रोजी पोलीस स्टेशन उमरखेड येथे तक्रारदार रतेराव अप्पाराव सोळंके वय 70 वर्ष धंदा सेवानिवृत्त रा. महागाव रोड जि. प. कॉलनी उमरखेड यांनी तक्रार दिली की, त्यांचा पुतण्या मृतक सुमीत प्रभाकर सोळंके वय 23 वर्ष रा. जिल्हा परिषद कॉलनी महागाव रोड उमरखेड हा दि. 12/10/2024 रोजी चे सकाळी 09/00 वा. दरम्यान हा कामा निमीत्ताने नेहमी प्रमाणे घराबाहेर गेला व सायंकाळी उशीरापर्यंत तो घरी परत आला नाही म्हणुन दिनांक 13/10/2024 रोजी पोलीस स्टेशन येथे तो हरविल्याबाबत रिपोर्ट दिली त्यावरून पोलीस स्टेशन उमरखेड येथे मिसींग क्र. 57/2024 दाखल करून शोध सुरू होतो. दरम्यान दुपारी 12 वाजताच्या सुमारास माहीती मीळाली की, सुमित हा चुरमुरा शेत शिवारातील जंगलामध्ये मृत अवस्थेत पडुन आहे. लगेच पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता चुरमुरा फाट्यापासुन चुरमुरा फुलसावंगी रोडवर रोड पासुन सुमारे 100 मीटर अंतरावर जंगलात मृतक सुमीत प्रभाकर सोळंके वय 23 वर्ष जिल्हा परीषद कॉलणी उमरखेड याचे प्रेत रक्ताने माखलेले मला दिसुन आले त्याचा चेहरा कपडे व शरीरयष्टीवरुन ते प्रेत सुमीतचे असल्याचे खात्री झाली. त्याच्या मानेवर व गळ्यावर कापल्याच्या जखमा दिसल्या. कोणीतरी अज्ञात आरोपीने मृतकचा खुन केल्याचे दिसत असल्याने तक्रारदार रतेराव अप्पाराव सोळंके यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपराध क्र.688/2024 कलम 103 (1) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंद करून तपासामध्ये घेतला.
गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेता मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप सर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आरोपी आरोपीने केलेल्या खुनाची मोडस पाहता आरोपी शोध बाबत महत्वपूर्ण सुचना दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उमरखेड श्री. हनुमंत गायकवाड साहेब व पोलीस स्टेशन उमरखेड पो. नि. श्री. पांचाळ साहेब यांच्या आदेशाने वेगवेगळ्या टीम तयार करून आरोपी च्या शोध साठी रवाणा करण्यात आल्या. स्थानीक गुन्हे शाखा यवतमाळ येथील अधिकारी सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे यांचे पथक तपास करीत असतांना मृतक हा त्याचा चुलत मामा संदीप अवधुत जगताप रा. नेर ता. माहूर याच्या मोटार सायकलवर बसुन जातांना दिसल्याने त्याच्यावर संशय बळावल्याने आरोपीला ताब्यात घेण्यासाठी एक टीम नेर ता. माहूर येथे रवाणा केली. आरोपी हा मृतक च्या अंतविधीसाठी आला आहे अशी माहिती मिळाल्याने आरोपीला महागाव रोडवरून ताब्यात घेऊन त्याला गुन्ह्याबाबत विचारणा केली असता आधी त्याने उडवाउडविची उत्तरे दिली परंतु विश्वासात घेऊन विचारणा केली असता आरोपी ने गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपीला गुन्हात अटक करण्यात आली आहे. आरोपी याने मृतकला पैशाच्या वादातुन धारदार शस्त्राने गळा चिरुन खुन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असुन अधिक तपास सुरु आहे.
सदर ची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सा. यवतमाळ श्री. कुमार चिंता सर, मा. अपर पोलीस अधीक्षक सा. श्री. पियुष जगताप सर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पो. नि. शंकर पांचाळ, तपास अधिकारी सपोनि निलेश सरदार, सपोनि कैलास भगत, सपोनि पांडुरंग शिंदे, प्रशिक्षणार्थी पोउपनि सागर इंगेळे, स्थानीक गुन्हे शाखा यवतमाळ येथील अधिकारी सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे पोहवा मुंडोकार, पोहवा रनखांब, पोहवा जाधव, पोहवा बोरगे, पोशि ताज, पोशि पंडागडे, चालक पोउपनि श्रीरामे, पो.स्टे. उमरखेड चे पोहवा विजय पतंगे, पोहवा दत्ता पवार, पोहवा दिनेश चव्हाण, नापोशि मोहन चाटे, नापोशि संतोष राठोड, प्रो शि गजानन गिते, पोशि गजानन आडे, चालक पोहवा अवदुत हिंगाडे,