विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
दिनांक १३ ऑक्टोंबर रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव सोहळा व चक्रवर्ती सम्राट अशोक विजयादशमी महोत्सव २०२४ मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
दिनांक ९ ऑक्टोंबर ते ११ ऑक्टोंबर पर्यंत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता विश्वालासांचा संदेश देणारे महकरूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्य शिल्पकार, महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून
पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण प्रा. डॉ.अनिल काळबांडे, भंते कीर्ती बोधी आणि हिराबाई दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थित महिलांनी पंचशील ध्वज गीत सादर करून धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायू व्हो…! जय भीम, जय बुद्ध अशा घोषणा देऊन त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल (पुसद अर्बन संचालक उमरखेड) होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ. अनिल काळबांडे, शंकर पांचाळ (ठाणेदार उमरखेड), प्रकाश दुधेवार (माजी नगरसेवक), वीरेंद्र खंदारे, राहुल काळबांडे, उत्तम शिंगणकर, सुनील चिंचोलकर (जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन युवा सेना यवतमाळ), पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, कुमार केंद्रेकर (अध्यक्ष शांतीदूत समिती) इत्यादी जण उपस्थित होते.
उपस्थित पाहुणे मंडळींचे ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा रमामाता महिला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ व पंचशील शाल देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अमूल्य मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले.
कु.समृद्धी आनंद दिवेकर हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर भाषण केले.
तर सायंकाळी ५ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधून भव्य मिरवणूक रॅलीचे आयोजन करून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुन्हा सदर राहिली डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे संपन्न करण्यात आली.
ही रॅली अतिशय शांततेच्या मार्गाने काढून संपन्न करण्यात आली. सदर रॅलीमध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा रॅलीला गालबोट लागणार नाही याची दक्षता आयोजन समितीने घेतली होती.
सदर रॅली अतिशय सुंदर प्रकारे संपन्न झाल्यामुळे सर्व स्तरावरून आयोजन समितीवर अभिनंदनचा वर्षाव होतांना दिसून येते आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड यांनी केले तर आभार संतोष इंगोले यांनी मांडले.
या कार्यक्रमाचे आयोजन धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समिती तथा रमामाचा महिला मंडळ यांनी केले होते.
तर उषाताई इंगोले (अध्यक्ष), भारतीय केंद्रेकर (उपाध्यक्ष), कांचन दिवेकर, उज्वला धबाले (सचिव), मधुबाला दिवेकर विद्या इंगोले, बेबाबाई गवंदे,सुनीता दिवेकर, राखी धबाले (कोषाध्यक्ष), स्वाती दिवेकर, प्रज्ञा दिवेकर, रंजना आठवले (संघटक), तुषार पाईकराव, मनोज इंगोले, प्रफुल दिवेकर इत्यादींनी परिश्रम घेतले.