विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बाळदी गावात ग्रामपंचायतच जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तांडा वस्तीमध्ये एका मेन रस्त्याच्या बाजूला सिमेंट राफ्टा फुटलेला असून त्या राफ्ट्या वरून जिल्हा परिषद शाळेतील बहुतांश विद्यार्थी ये जा करत असल्यामुळे त्यांना खूप मोठ्या काटकसरीने प्रवास करावा लागतो तसेच जर एखाद्या शाळेकरी विद्यार्थ्यांचा पाय गेला त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. महत्त्वाची नाली असल्यामुळे त्या नादीला संडासचे पाणी पण येत असते. ती बाब लक्षात घेऊन तेथील नागरिकांनी फोनद्वारे तसेच ग्रामपंचायतला जाऊन सरपंच साहेबांना भेटून सविस्तर माहिती दिली असता गावातील सरपंचाने दिनांक 2 ऑक्टोंबर ला त्याबद्दल निर्णय घेऊ असे आश्वासन देऊन तेथील नागरिकाची दिशाभूल केली. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्या राफ्ट्याची पाहणी करून त्वरित ते काम चालू करावे. अन्यथा आम्ही हा विषय घेऊन कुणाकडे जायचे असा प्रश्न तेथील नागरिकांनी उपस्थित केला.
तसेच गेल्या तीन ते चार महिन्यापासून दर रविवारी सुट्टीच्या दिवशी ग्रामसेवक हा ग्रामपंचायत मध्ये आपली हजेरी लावत आहे. तेव्हा काल दिनांक 6 ऑक्टोंबर 2024 रोजी गावातील पत्रकार अतिश वटाणे व तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे बाळदी प्रमुख, प्रवीण इंगळे यांनी ग्रामसेवकास विचारले असता तेव्हा त्यांनी माझे काही राहिलेली कामे करण्यासाठी येत असतो असे उडवा उडवीची उत्तर त्यावेळेस दिली. प्रशासनाचे अधिकारी व ग्रामपंचायत सुट्टीच्या दिवशी आपली कामे त्यांना करता येतात तर गाव विकासासाठी गावातील नालीची दुरावस्था काही ठिकाणचे राफ्टे,गड्डे याकडे ग्रामपंचायत कधी लक्ष देणार अशीही चर्चा गावातील लोकांकडून ऐकायला मिळते सदर बाब लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून योग्य ते कारवाई करावी. अन्यथा गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गावातली नागरिकांनी दिला.