विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या ढाणकी कार्यकारणी घोषित करण्यात आली दि. २९ सप्टेंबर रोजी ढाणकी येथील भोसले वाडा येथे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचलवार यांच्या नेतृत्वात जिल्हा उपअध्यक्ष संजय भोसले यांच्या मार्गदर्शनात सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेव गोपेवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत कार्यकारणी गठीत करण्यात आली. युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या ढाणकी शाखेचे अध्यक्ष म्हणून अशोक लक्ष्मण गायकवाड उपाध्यक्ष कैलास किशन घुगरे , सचिव करण भरणे , सहसचिव शेख इरफान शेख गुलाब , कोषाअध्यक्ष मिलिंद चिकाटे ,उपकोषाअध्यक्ष बंटी फुलकोंडवार, संघटक नामदेव गोपेवाड, व प्रसद्धी प्रमुख म्हणून महेबूब शेख आणि अजीज खान, सदस्य म्हणून प्रशांत आरेवाड, रवी जुकुंटवार, रमेश रावते, डॉ. जगदीश रावते आणि विनोद वाढवे व सीमा गायकवाड यांची जिल्हाध्यक्ष व सदस्य संमतीने नामनिर्देशन करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचलवार आणि जिल्हा उपअध्यक्ष संजय भोसले म्हणाले की, पत्रकार मित्रांच्या हितासाठी, विकासासाठी आणि न्यायासाठी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी आणि सरकारी प्रशासनाकडून लोकांना खोट्या प्रकरणात अडकवणे आदी मुद्द्यांवर पत्रकार मित्रांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
प्रसद्धी प्रमुख शेख महेबूब यांनी आभार व्यक्त केले.