महागाव तालुका प्रतिनिधी
तुकाराम उमरे.
लोकहित लाईव्ह न्युज चैनल
धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाने सुरू केलेल्या पंढरपूर येतील आंदोलनात तोडगा म्हणून आपण धनगर समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यासाठी धनगर व धनगड हे एकच आहे असा चुकीचा असलेला स्वातंत्र्य जीआर काढण्यात येत आहे असे कळले आहे हा जीआर मूळ आदिवासी समाजावर अन्यायक ठरणार धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण लागू आहे व धनगर समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला आदिवासी समाजाचा कुठलाही विरोध नाही परंतु अनुसूचित जमातीचे धनगर समाजाला समाविष्ट करणे असा चुकीचा जीआर काढू नये अन्यथा आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करावा लागेल असे निवेदन तहसीलदार साहेबा मार्फत शासनाला देण्यात आले त्यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते