आज दि.१२/०९/२०२४ ला कोरटा येथे .. १सप्टेंबर रोजी झालेल्या पूरजन्य परिस्थिती मुळे १५० कुटुंबाचे घरात पुराचे पाणी सिरुन अतोनात नुकसान झाले होते..
पूरग्रस्त कुटुंबांना अजुन पर्यंत कोणतीही मदत कोणाकडूनही मिळाली नसतांना ग्रॅन्ड मराठा फाऊंडेशसारख्या सेवा भावी संगटनेने मदतीचा हात पुढे करून १५०पूरपिढीत कुटुंबांना अन्न धान्य किट चे वाटप करण्यार आले.
राजू भाऊ तीलेवाड व त्यांच्या टीम च्या पुढाकारातून ग्रॅन्ड मराठा फाउंडेशन चे प्रजवल सर शिवप्रभा ट्रस्ट चे सोहम नरवाडे सर यांचे हस्ते आणि गावातील जेष्ठ सा. युवा सामाजिक कार्यकर्ते मंडळी च्या उपस्थितीत अन्न धान्य किट चे वाटप करण्यात आले.
सर्वात अगोदर ग्रॅन्ड मराठा फाउंडेशन कडून पूरग्रस्त कुटुंबांना मदत पोहचविण्यबद्दल सर्व पूरपिढीत कुटुंबाने ग्रॅन्ड मराठा फाउंडेशन चे आभार मानले.