विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
तालुक्यातील देवसरी येथील इसम पैनगंगा नदीवरील बंधा-याजवळ पाण्यात पडला होता. गेल्या दोन दिवसापासून त्याची शोधमोहीम सुरु होती. अखेर आज त्याचा मृतदेह आढळला.
संदिप देवसरकर (३७) रा. देवसरी असे मृतकाचे नाव आहे. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी देवसरी गावाजवळच असलेल्या पैनगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ पाण्यात पडल्याची घटना घडली
होती. त्यानंतर पैनगंगा नदिपात्रात सर्वत्र गावकरी, नातेवाईक यांनी शोधाशोध केली. परंतु त्याचा शोध लागला नाही. अखेर एन. डि. आर. एफ पथकांच्या मदतीने चातारी परीसरातील नदिपात्रात शोध मोहिम राबविली. ११ सप्टेंबर रोजी ३७ तासानंतर मृतदेह सापडला. मृतक संदिपच्या पाठीमागे आई, पत्नी, मुले असा परिवार आहे. संदिपच्या अपघाती मृत्यूमुळे देवसरी गावावर शोककळा पसरली आहे.