
*कृषी विभागांच्या योजनांची दवंडी द्वारे जनजागृती*
*कृषी सहायकाने हाती घेतला उपक्रम*
दारव्हा मौजा चांनी येथे दि. 11/1/2025 रोजी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी फळबाग योजना ,शेततळे,पीएमएफएमइ व कृषी विभागातील विविध योजना विषयी दवंडी देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी फळबाग योजना शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला जोड म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबागेसाठी अर्ज करावेत. फळबागेमध्ये संत्रा,मोसंबी,लिंबू,आंबा, आवळा चिकू अशा विविध फळ पिकाचा समावेश आहे व त्यासाठी अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच शेततळे व पीएमएफएमइ ,भाऊसाहेब फळबाग फुंडकर योजने विषयी मार्गदर्शन पी.एस.बोईनवाड कृषी सहाय्यक यांनी केले आहे.
यावेळी गावातील उपसरपंच गजानन भाऊ गुल्हाने, नितीन श्रीरामे,संतोष शिंदे,देवानंद राठोड,
नरेश आजमिरे,जीवन शिरभाते, मधुकर अजमीरे,रवींद्र आजमिरे ,संदीप फुपरे, माणिक आजमिरे,रमेश गुल्हाने मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.