
दिनांक 06/06/2025 रोजी फिर्यादी गणेश आनंदराव जाधव यय-38 वर्ष रा.नागापुर (पळशी) ता उमरखेड जि. यवतमाळ यांचे फिर्यादवरुन पो स्टे उमरखेड येथे अप क्र 419/2025 कलम 303(2) BNS अन्वेय गुन्हा दाखल झाला होता
सदर गुन्ह्यात माननीय पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली डिटेक्शन ग्रंचचे प्रमुख पोउपनि सागर इंगळे व डि वो टिम यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या बाजुच्या नाग चौक येथे लावलेले पोलीस स्टेशनचे सी सी टि व्हि चेक केले असत्ता त्यांना सदर आरोपी हा तेथे येवून फिर्यादीची मोटर सायकल घेवुन जातांना दिसल्यावरुन पुढील सी सी टि व्हि चेक केले असता आरोपी हा महागाव वायपास रस्त्याने जात असतांना दिसल्यावरुन सदर सी सो टि व्हि फ्युटेज हे गोपनिय बातमीदार यांना दाखवून सदर आरोपी विनोद आनंदराव चव्हाण वय 34 वर्ष, रा चुरमुरा. ता.उमरखेड जि. यवतमाळ असा असल्याचे निष्पन्न झाले. वरुन सदर आरोपीचा शोध घेतला असता तो रामनगर तांडा (चिल्ली) मोटार सायकल सह दिसल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन त्याचे कडुन चोरी गेलेली एक हिरो कंपनीची प्लेन्डर प्लस मोटर सायकल जिचा क्रं MH-29- AF -4376 कि अंदाजे 25000/- रुपये चा वर्णणाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड सा.. पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ सा. यांचे मार्गदर्शनाखाली डि.बी.प्रमुख पोउप निरीक्षक सागर इंगळे, पोहेका/1186 मधुकर पवार, पोहेका/2020 संदिप ठाकुर, पोशि/1652 संघशिल टेंभरे, पोशि/1191 निवृत्ती महाळनर, पोशि/928 प्रफुल घुसे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका 408 बेद्रे हे करीत आहे.